तसे पाहता माझ्या दृष्टीने प्रत्येकाचे ध्येय साध्य करण्यासाठी काही प्रेरणादाई स्त्रोत असतात . तसे पाहता श्री राधा माझ्या नसा नसात बसलेली शक्ति आहे , अस मला वाटत . कारण जीवनाच्या एका वळणावर देवी ने माझ जीवनच बदलवून टाकले . मी आता जसा पहिले होतो तसा मी राहिलो नाही .
पूर्वी मी छोट्या छोट्या गोष्टीला महत्व देत असे , आणि मला सर्वांसारख्याच समस्याना तोंड द्याव लागत असे . आज ही आयुष्यात खूप समस्या समोर येतात . पण मी त्याला तितकस महत्व देत नाही . कदही कधी दुसरे लोक त्यासाठी दु:ख व्यक्त करतात की तुझ्या बरोबर खूप वाईट झाले . पण मला कधीच ते वाटत नाही . वाटल तरी आता ती माझ्यासाठी महत्वाची गोष्ट राहिली नाही .
मी काही दैवी चमत्कारा बद्दल बोलत नाही , की कोणत्या अंधश्रद्धे बद्दल बोलत नाही . माझा स्वतचा या दोन्ही गोष्टीं ना अजिबात सपोर्ट नाही . कारण या दोन्ही गोष्टीं जवळ ढोंगी पणा निवासीत असतो .
मला काही गोष्टी गरज नसताना कराव्या लागतात , जसे घरचे चालले कोणत्या देवलासी बाबा कडे , मग ते एक धागा देते , आणि ते सारे .. कारण मला वाटते देवी इतकी माझ्या जवळ आहे तर मग , ह्या सर्वांची गरज काय , पण मनातून जशी देवीच बोलावी तसा आवाज येतो , अरे बिचारे घाबरले आहेत , संसारात पार गुंतले आहेत , तर्क करण्या पेक्षा घालून घे ते एकदा आणि चल पुढे , तुझी वाट इथे नाही , तू अंतरंगात जा , तिथे तुझ सुख , श्री राधा आहे .